
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या वर्धपुर येथे भारत संचार निगम लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे पंचवीस वर्षानंतर वर्धपुर गावात मनोरा(टॉवर )उभारण्यात आले मात्र निर्मितीच्या पाच महिन्यापासून मोबाईल नेटवर्क पकडत नसल्यामुळे ग्राहकांची घोर निराशा झाली आहे बीएसएनएलचा टावर गावात उभा झाल्याने कंपनीच्या ग्राहक संकेत वाढ झाली अनेकांनी बीएसएनएल कंपनीचे सिम कार्ड नवीन घेतले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर ग्राहकांना मनस्तापाला समोर जावे लागत आहे संबंधित बीएसएनएल कंपनीचे अधिकारी वर्ग सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्यामुळे कर्तव्यापेक्षा पगाराला अधिक महत्त्व देत आहे त्यामुळे सततची डोकेदुखी आता ग्राहकांना नकोशी झाली आहे त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून काहीतरी दखल घेण्यात यावी अशी बीएसएनएल ग्राहकाची मागणी आहे