
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला येत्या तीन महिन्यांमध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आज त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत बैठकीमध्ये या प्रकल्पाचा आराखडा पाहिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आराखडा पाहिला. फडणवीस यांनी प्रकल्पाच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवला.
आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना जितका मोबादला दिला नाही, त्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधील कॉरिडॉर पाधितांना देण्यात येईल असे देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता, काही घरे ताब्यात घ्यावी लागणार आहेत अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पंढरपूर कॉरिडॉरसाठी ज्यांची जमीन जाईल, त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. त्यांना चांगला मोबादला दिला जाईल. तसेच आषाढी वारीच्या पूर्वी या प्रकल्पातील काही कामे सुरु होतील. तर आषाढीच्या नंतर काही कामांना सुरुवात होईल असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांसमोर केले आहे.