
देगलूर प्रतिनिधी
दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी
प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सगळीकडेच विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी दिसून आली असून देगलूर येथे हिंदू एकता दिवसनिमित्त प्रभू श्रीरामजी व सीता मातेच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी झेंडा, लाईन गल्ली येथून दुपारी ४ वा. शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आले.सदरील शोभायात्रा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आले.तर दुसरी शोभायात्रा बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथून किशोर तोटावर व किरण कडलवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली होती . या कार्यक्रमास आलेल्या राम भक्तांना प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त व शोभा यात्रेतील श्रीराम भक्त व सर्व हिंदू बांधव व माता-भगिनि फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खुशी सेवाभावी संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते बबलु टेकाळे यांनी केले होते. या भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये देगलूर शहरातील व तालुक्यातील अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी तसेच हजारोच्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते .