दैनिक चालु वार्ता बीड प्रतिनीधी –
परळी वैद्यनाथ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सकाळी 11 वाजता परळी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना भीम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूस आंबेडकरी अनुयायांच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत वही व पेन वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमातही धनंजय मुंडे यांनी सहभाग घेऊन आपल्या हाताने विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले.
यावेळी युवक नेते अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, रवींद्र परदेशी, डॉ. विनोद जगतकर, अभय मुंडे, इंटकचे दत्तात्रय गुट्टे, अनंत इंगळे, रवी मुळे, अमर रोडे, भीमराव डावरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, सय्यद सिराज, लक्ष्मण मुरकुटे, महेंद्र रोडे, गणेश मुंडे यांसह पदाधिकारी व असंख्य अनुयायी उपस्थित होते.
