दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
७ मार्च २०२४ पहिले १२ मे २०२४ ला दुसरे १२ सप्टेंबर २०२४ तिसरे आणि २५ मार्च २५ रोजी चौथे निवेदन देऊनही संबंधित प्रशासन निष्क्रिय अखेर भूमिकेतच?
—————————————-
वर्धा – आष्टी : तालुक्यातील ग्रा. पं.बोरगाव(टू) येथील घरकुल बांधकाम अंतर्गत शबरी तसेच रमाई घरकुल योजनेचे मजुरी देयक गेल्या दीड वर्षापासून मिळालेच नाही त्यासाठी आर्वी विधानसभा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुरज ढोले यांनी अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग ढोले यांनी पत्कारला आहे त्यांनी संबंधित प्रशासनास ३१ मार्च पर्यंत मजूर देयके काढण्यासाठी डेडलाईन दिली होती आणि १५ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता असे पंचायत समिती आष्टी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक वर्धा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे आजरोजी आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरज ढोले यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे सदर घरकुल योजना आदिवासी आणि बौद्ध समाजासाठी कार्यान्वित आहे यात बोरगाव(टू) येथील निलेश लीलाधर उईके, उज्वला प्रेमानंद वाघमारे, रूपराव शंकरराव मनोहरे यांच्यासह आष्टी पंचायत आणि हा संपूर्ण जिल्ह्यातील प्रश्न आहे आणि तो निकाली काढण्यासाठी मी आमरण उपोषण करीत आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
प्रतिक्रिया
सुरज ढोले यांना राजकीय वारसा हा त्यांचे वडील लोकनेते स्वर्गीय मोहनराव ढोले यांच्यापासूनच मिळाला आहे तोच दलित, शोषित, वंचित, पीडित लोकांच्या समस्येसाठी प्राधान्यक्रम देणे ही ढोले परिवाराचची परंपरा आहे त्याला अनुसरूनच सुरज ढोले आदिवासी आणि बौद्धांच्या समस्या विषयी जिकरीने लढा देत आहे त्यांचा लढा हा गांधीजीच्या मार्गाने आहे आणि तो लढा ते यशस्वी करून दाखवतील असा आदिवासी, बौद्ध आणि ओबीसी समाजाला ठाम विश्वास आहे
युवराज राऊत
निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता
आष्टी जिल्हा वर्धा
