दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
जेजुरी दि. (प्रतिनिधी) – जेजुरी येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय, कृषी विभाग कार्यालय, विद्युत वितरण विभाग कार्यालय,हि सर्व शासकीय कार्यालये शहरापासून एक ते दोन किलो मीटर अंतरावर असल्याने सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत असुन त्याचा त्रास सहन करावा लागत आहे जेजुरी नगरपालिकेने व्यापार संकुल अथवा नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर या सर्व कार्यालयांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा नगरपालिकेच्या इतर असलेल्या जागे पैकी एक जागा सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जेजुरी शहर महायुतीच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना निवेदन देऊन करण्यात आली असून या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे, जिल्हाधिकारी जितेंद्रजी डूडडी यांना देण्यात आली यावेळी जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश लेंडे, शिवसेनेचे इरफान बागवान,लाला शिंदे, भाजपचे प्रसाद अत्रे, हरिश्चंद्र भापकर, स्वानंद अत्रे, सिद्धार्थ मुळीक, निलेश शिंदे आदि उपस्थित होते
