
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या गुणांचा सन्मान व्हावा याकरिता दिनांक २ रोजी स. ०९.०० वा. फुटवाले धर्मशाळा, आळंदी या ठिकाणी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. माधव खांडेकर यांचे अध्यक्षतेखाली आदर्श विद्यार्थी पुरस्कार २०२४-२५ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांची उपस्थिती, वर्षभरातील परिक्षेचे गुण, चारित्र्य, विविध उपक्रमातील सहभाग व खेळातील प्राविण्य या निकषाच्या आधारे नगरपरिषद शाळा क्र. १ ते ४ मधील समृद्धी गजानन नरवडे, राधिका बालाजी केंद्रे, ईश्वरी बाबासाहेब सरवदे, ज्ञानराज रामेश्वर वैद्य प्रणाली गोपाल भोयार आल्फीया यादुल पठाण पार्थ जानकीदास वैष्णव सृष्टी केशव गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून त्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे संपुर्ण सुत्र संचालन नगरपरिषद शिक्षण मंडळातील कुंभार सर व श्री बहिरट सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपआपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माधव खांडेकर यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेतील जास्तीत जास्त उपक्रमामध्ये सहभाग घेवून गुणवंत विद्यार्थी होण्यासाठी प्रोत्साहन केले व आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे नगरपरिषद शाळा क्र. १ या शाळेस आदर्श शाळा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित मान्यवरापैकी मा. डी.डी. भोसले पाटील यांनी नगरपरिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची व पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद शाळांची क्रिडा स्पर्धा आयोजित करण्याच्या सुचना केल्या. यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी शासनाची परवानगी घेवून क्रिडा स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पाठ पुरावा करणार असल्याचे सांगितले. यानंतर पुरस्कृत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हटले व नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी श्रीमती अर्चना भिसे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे घोषित केले. या कार्यक्रमासाठी मा. .
डी.डी. भासले पाटील, मा.
. संजय घुंडरे, मा. . प्रशांत कु-हाडे, मा. . सचिन गिलबिले, मा.
दिनेश घुले, मा. . सागर भोसले, मा. . प्रकाश कु-हाडे, मा. श्री. रोहिदास तापकीर, मा.
अशोकराव उमरगेकर, मा. श्रीमती सुनिता रंधवे, मा. श्रीमती रुक्मिणी कांबळे, मा. श्री. गणेश
रहाणे, मा. श्री. सचिन काळे, मा. . संदेश तापकीर, मा. श्री. ज्ञानेश्वर रायकर, मा. श्री. श्रीधर
कु-हाडे, मा. श्री. राहुल चव्हाण तसेच स्थानिक नागरिक व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी मा. श्रीमती सोनाली झिझुंर्डे, नगरपरिषद शाळा क्र. १ ते ४ चे मुख्याधापक, शिक्षक व शिक्षीका तसेच शहरातील सर्व पत्रकार इ. ग्रामस्थ उपस्थित होते.