
पाकिस्तानी न्यूज वेबसाइट डॉन वरील एक बातमी काही सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली जात आहे. त्यात वैद्यकीय अहवालही शेअर केला आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तुरुंगात सैन्य अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचे म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दलची एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुरुंगात खान यांचे लैंगिक शोषण झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी न्यूज वेबसाइट डॉन वरील एक बातमी काही सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली जात आहे. काही हँडलने वैद्यकीय अहवालही शेअर केले आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले की, इम्रान खानवर पाकिस्तानी लष्कराच्या मेजरने बलात्कार केला आहे.” पाकिस्तानी कैद्यांमध्ये पुरुषांवरील लैंगिक हिंसाचार सामान्य आहे. ते त्या व्यक्तीचा अभिमान आणि प्रतिष्ठा हिरावून घेण्यासाठी असे करतात. या सर्व दाव्यांना अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्या आल्यानंतर, पाकिस्तानी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आदियाला तुरुंगात भेट दिली. तपासणी ३० मिनिटे चालली. अहवाल लगेच प्रसिद्ध झाला नाही. इम्रान खान यांचा पीटीआयच्या आणखी एका नेत्याने दावा केला होता की खान यांना त्यांच्या बहिणी किंवा इतर नातेवाईकांना भेटण्याची परवानगीही दिली जात नाही.