वादळ आला अन् क्षणातच मंडप हवेत उडाला; वऱ्हाडींनी केलं असं की व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल…
सध्या लग्नांचा सीजन सुरु आहे. आता लग्न म्हटलं की, या एका सोहळ्यात अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. अजब-गजब उखाणा, लग्नातील डान्स, वेगवेगळ्या हटके गोष्टींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो. भारतात लग्न म्हणजे काही ना काही नवीन गोष्ट घडतेच. कधी काय होईल याचा अंदाज लावणे कठीणच असते. आता अशाच एका लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. असं काय घडलं…
लगीनसराईच्या दिवसात सोशल मीडियावर अनेक लग्नांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, काही लग्नांतील दृश्य सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. प्रत्येक जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो आणि लोक तो दिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यासाठी खूप काही करतात. लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि थाटमाट. मात्र, एका लग्नात अचानक आलेल्या वादळाने असं काही केलं की, हे लग्न सर्वांच्या आठवणीतच राहणार, या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जे पाहून नेटकरी हसायला लागले आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
लग्नाचा मंडप हवेत उडाला
सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका गावात घराबाहेर लग्न होणार असल्याने सुंदर सजावट करुन मंडप टाकण्यात आला. पण थोड्याच वेळात लग्न सुरू असताना एक चक्री वादळ आला आणि क्षणातच मोठी खळबळ उडाली. हवा इतक्या जोरानं वाहू लागली की संपूर्ण मंडपच उडून गेला. लग्नाचा मंडप वाचवण्यासाठी या लग्नातील लोक तंबूला धरून ठेवण्याचा आणि तो उडून जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करु लागले. या लोकांनी पूर्ण ताकदीने हे बांबू खेचून मंडप वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण शेवटी निसर्गासमोर कुणाची चालेना. मंडप हवेत उडतो. आणि आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हा व्हिडीओ @RupeshRupam95 या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय की, ‘हे वाईट झाले, असे घडायला नको होते.’ काहींनी म्हटलंय, ‘सर्वांनाच हे लग्न आठवणीत राहील.’ अशा प्रकारच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
