
केंद्राच्या सूचना असल्याचा दावा; सत्य काय ?
पहलगाम दशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले व्यवहार तोडले आहेत. त्यामुळे भविष्यात दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता व्यक्त होतंय.
या पार्श्वभूमीवर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकराने लोकांना रोख रक्कम सोबत ठेवण्याचं आवाहन केल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारची ही advisory notice असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक वस्तू घरी ठेवण्याचं आवाहन केल्याचं म्हटलंय. दोन महिन्यांसाठीचे औषधं, ५० हजार रुपये रोख, इमर्जन्सी संपर्काची साधणं; अशा गोष्टी सोबत ठेवावे, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
तसेच सीमेवर तणाव वाढत असल्याने लोकांनी शांत आणि सतर्क राहावं, असं आवहन व्हायरल अॅडव्हायजरीमध्ये म्हटलेलं आहे.
मात्र पीआयबीने यातील तथ्य शोधून काढले आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेला तो मेसेज खोटा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. केंद्र सरकारने अशी कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे. शिवाय सध्याच्या तणावपूर्ण काळामध्ये लोकांनी सोशल मीडियावरील मेसेजवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केलं आहे.