
भारत-पाक युद्धानंतर नेमकं काय होणार;नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीची जगभर चर्चा…
फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता ‘मायकल दी नास्त्रेदमस’ यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा कायम दावा करण्यात येतो. नास्त्रेदमसने लेस प्रोफेटिजमध्ये 2025 विषयी भाकीत केले होते.
त्यात भारत, नवीन राजकीय नेत्याचा उदय, भारत-पाक संघर्ष आणि हिंदू धर्म याविषयी भाकीत केले आहे. आजच भारताने मध्यरात्री 1 ते भल्या पहाटेपर्यंत पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणं लक्ष्य केली. त्यानंतर या भविष्यवाणीची एकच चर्चा सुरू आहे.
नास्त्रेदमस याचा जन्म फ्रान्समधील वाडी वजा गाव सेंट रेमी येथे 14 डिसेंबर 1503 रोजी झाला होता. 1566 यावर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याने 2025 या वर्षासाठी काही भयावह भविष्यवाण्या केल्या आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्या ताणतणाव वाढला आहे. दोन्ही देशात केव्हाही युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया आणि युरोपातील अनेक छोट्या छोट्या देशात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. युक्रेन-रशिया, इस्त्रायल-हमास आणि इतर दहशतवादी संघटनांमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचवेळी नास्त्रेदमसने हिंदू धर्माविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे.
नास्त्रेदमसच्या मते भारताने पाकिस्तानविरोधात सतर्क आणि सजग राहावे. पाकिस्तान हाथीसारखा येऊन त्याच्यावर हल्ला करू शकतो. 2025 मध्ये यु्द्धाच्या वाऱ्यासोबतच उष्णतेची लाट होरपळून काढेल असे भाकीत त्यांनी केले.
नास्त्रेदमस याने त्याच्या भाकितात, हिंदू धर्माचे पुनर्जीवन होईल. दक्षिण भारतातील एक नेता संपूर्ण जगावर छाप टाकेल. रशिया सारखा ताकदवान देश सुद्धा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल. नास्त्रेदमसच्या भाकितानुसार, 21 व्या शतकात भारत एक शक्तिशाली देश म्हणून उभरेल. भारतीय संस्कृती, वेद आणि योगाचा जगभरात डंका वाजेल.
जगात दक्षिण भारतच एकमेव असे द्वीप आहे, जिथे तीन समुद्र एकत्र येतात. नास्त्रेदमस याच्या मते, तो महान हिंदू नेता जो शत्रूंना कर्दनकाळ ठरेल, तो या दक्षिण भारतातूनच येईल. तो गुरुवार या दिवशी पूजा पाठ करेल. या दिवसाचे महत्त्व त्याच्यासाठी खास असेल.