
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील मठपिंपळगाव शिवारातील अवैधरित्या दुधना नदी पात्रातून अज्ञात व्यक्ती वाळू उत्खनन करत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली त्या आधारे वाळू माफियाना आपण आल्याचे सांगवा लागू नये म्हणून अंबड पोलीसांना काल(6)मंगळवारी मध्यरात्री अचानक चक्क बैलगाडी मध्ये जाऊन मठ पिंपळगाव तालुक्यातील अंबड दुधना नदीपात्रात मध्ये अचानक छापा मारला. यावेळी ते वाळू चोरी करणारे वाळू माफिया हायवासह मिनी हायवा .जेसीबी असा एकूण 55 लाख रुपयांची मुद्देमाल जप्त केला आहे .या संदर्भात अधिक माहिती अशी की अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव शिवार दुधना नदीपात्रातून काही लोक व हायवा व जेसीबी ने वाळु चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अंबड पोलिसांनी मिळालेल्या माहिती अनुसंगाने याबाबत कारवाई करण्यासाठी अंबड ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले. व पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे .व दिपक चव्हाण अरूण मुंडे. चालक भानुसे. स्वप्निल भिसे यांनी काल(6)मंगळवारी मध्ये रात्री नंतर म्हणजेच रात्री 2:30 वाजेच्या सुमारास वाळू माफियां यांना चकवा देण्यासाठी एक बैलगाडी तात्काळ उपलब्ध करून अडचणीच्या रस्त्यातून मठपिंपळगाव दुधना नदी पात्रात अचानक छाप मारून यावेळी पोलिसांकडून सदर ठिकाणी हायवा व एक मिनी हायवा व जेेसीपी असा एकूण 55 लाख रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जैसी कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पल पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल गुरलेसह पोलीस निरीक्षक पोउपनि भगवान नरोडे पो.हे. को दीपक पाटील. पो.काॅ. अरुण मुंडे भानुसे स्वप्निल भिसे यांनी पार पाडली आहे