
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- लोहा तालुक्यातील कौडगाव गोदावरी नदी घाटावर पोलिस व महसल संयुक्त पथकाने अवैध वाळू उपसा होत असल्याचे माहितीवरून बुधवारी दि.७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता अवैध वाळू उपसा करणारे २ छोटे इंजिन जिलेटीन कांड्याने उद्ध्वस्त करण्यात आला तर ३२ हजारांची ८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. दरम्यान संयुक्त पथकाची कौडगाव येथील वाळू घाटावरची ही पहिलीच कारवाई आहे.
कौडगाव नदीघाटातून अवैध वाळू
उपसा होत असल्याच्या माहितीवरुन कापसीचे मंडळाधिकारी चंद्रशेखर सहारे सपोनि महेश मुळीक यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी दि.७ मे रोजी सायंकाळी अवैध वाळू उपसा करणारे २ इंजिन पकडले. अंदाजे ५ लाख रूपयांचा मुद्देमाल जिलेटीनच्या साह्याने नष्ट केला. ३२ हजार रुपये किंमतीची ८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण गोधणे, मोतीराम पवार, जमादार माधव पवार, वरपडे यांनी ही कारवाई केली.