
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-आष्टी :- तालुक्यातील देलवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात सि.पि.आर. प्रशिक्षण संपन्न झाले सदर सि.पि.आर. प्रक्रिया ही हृदयरोग या आजारात
कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन
ही एक प्रथमोपचार प्रक्रिया आहे जी हृदयविकाराच्या झटक्यानंतर किंवा श्वासोच्छ्वासाला त्रास होत असलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी वापरली जाते.
प्रक्रिया:
यामध्ये व्यक्तीच्या छातीवर दाब देऊन आणि तोंडात श्वास देऊन रक्ताभिसरण आणि श्वासोच्छ्वास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
महत्व:-सिपीआर तात्काळ केल्यास हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचण्याची शक्यता वाढते. या प्रशिक्षणात या मध्ये सिपीआर कोणत्या रुग्णाला द्यावा, कसा द्यावा,सिपीआर देते वेळी कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण महिती देण्यात आली तसेच सिपीआरचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज ठवळी सरपंच प्रनोती उईके उपसरपंच अक्षय कोहळे औषध निर्माण अधिकारी कुंभराज डहाके आरोग्य सेवक ए.एम. पिपराडे आरोग्य सेविका संध्या रामटेके,आरोग्य सहाय्यक गेडाम,अंगणवाडी सेविका शितल कोहळे, आशा स्वयंसेविका हर्षा भगत,परतेती,ग्राम पंचायत सदस्य व ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समिती पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.