
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती.तसेच केंद्रातील मोदी सरकारवर नेहमी कुरापती काढणार्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी प्रचंड दबाव वाढत चालला होता.
पण अखेर ‘परेशन सिंदूर करत पाकिस्तानवर पहिला दणका दिला होता. मात्र,त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारताच्या तिन्ही दलानं पाकिस्तानवर जोरदार हल्ले चढवले.या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलं आहे.
भारतानं पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देतानाच मोठी कारवाई केली. या कारवाईत थेट इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी, सियालकोट,पेशावर यांसारख्या प्रमुख शहरांनाच टार्गेट केलं होतं. तसेच भारतीय आर्मीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 60 किलोमीटर आत घुसुन दहशतवादी हल्ले उध्वस्त केले. पण या कारवाईला सुरुवात करण्याआधी जम्मू विमानतळासह काही ठिकाणी ड्रोन हल्ले करत भारताला चुचकारलं होतं.
भारतानं मग प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला अमेरिकेनं कडक शब्दांत सुनावलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाल्या, पाकिस्ताननं दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी. त्यांनी पाकिस्तानने आणखी परिस्थिती बिघडू नये असाही सल्लावजा इशारा दिला आहे.
पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या, पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात काय घडले याची स्वतंत्र चौकशी हवी आहे अशी चर्चा आहे. आम्हाला गुन्हेगारांना जबाबदार धरायचे आहे आणि या दिशेने होणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी म्हटल्याचं अधोरेखित केलं.
तसेच आम्ही भारत आणि पाकिस्तानला या प्रकरणावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे आवाहन करत असल्याचंही अमेरिकेनं सांगितलं आहे. तसेच आपली सध्या,दोन्ही सरकारांशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव त्वरित कमी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी एस.जयशंकर यांनी सीमापार दहशतवादालाच भारतानं लक्ष्य केल्याची माहिती दिली होती.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.तसेच त्यांनी अमेरिका दक्षिण आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.कारण ते या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.रुबियो यांनी असेही भर दिला की, पाकिस्तान आणि भारत दोघांनीही तणाव कमी करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे,अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.