
भारत सर्व बाजूंनी पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करताना दिसत आहे. भारत – पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण असताना एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एअरपोर्ट्सद्वारे व्यवस्थापित छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) येथून उड्डाण करणं 16 मे पासून महागणार आहे.
एयरपोर्ट्स इकोनॉमिक रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने डॉमेस्टिक आणि इंटरनेशनल या दोन्ही उड्डाणांसाठी यूजर डेवलपमेंट फीस (UDF) मध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे 2025 ते 31 मार्च 2029 या चार वर्षांसाठी ऑर्डर जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत डॉमस्टिक प्रवासी यूडीएफ देत नव्हते. पण 16 मे पासून डिपार्चर आणि अरायवल दोघांसाठी यूडीएफ आकारण्यात येणार आहे. 16 मे पासून मुंबई विमानतळावरून प्रवास करणं किती महाग होईल जाणून घेऊ…
देशांतर्गत प्रवाशांना विमानतळावरून निघताना 175 रुपये आणि सीएसएमआयए येथे आगमन झाल्यावर 75 रुपये यूडीएफ द्यावं लागणार आहे. विमानतळाने यापूर्वी डिपार्चरसाठी 325 रुपयांचा यूडीएफ प्रस्तावित केला होता. तथापि, मंजूर झालेला यूडीएफ प्रस्तावापेक्षा सुमारे 50 टक्के कमी आहे.
आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लास प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी क्लास प्रवाशांसाठी वेगवेगळे UDF आकारण्यासाठी परिवर्तनशील दर योजना असण्याच्या CSMIA च्या प्रस्तावाला ERA ने मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लास प्रवाशांना 695 आणि आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी क्लास प्रवाशांना 615 रुपये यूजर डेव्हलपमेंट चार्ज भरावं लगणार आहे. आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लासच्या प्रवाशांना उतरण्यासाठी 304 रुपये UDF आणि इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना 260 रुपये द्यावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळ हे अदानी समूहाच्या नेतृत्वाखालील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) द्वारे चालवलं जातं. हे विमानतळ दरवर्षी 35 लाख किंवा त्याहून अधिक प्रवाशांना सेवा देतं. हे प्रमुख विमानतळांच्या श्रेणीत येतं