
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :-
मुदखेड भोकर रोडवरील जांभळी – बेंबर वरुन भोकरला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम मागील सहा महिन्यांपासून गणेश इंटरप्राईजेस या कंपणी कडुन चालू असुन या कामामध्ये मुरमा ऐवजी लाल माती वापरली जात असल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा ढासाळला आहे.
मागील अनेक वर्षापासुन जांभळी, बेंबर, भोकर जाणाऱ्या रस्त्याच्या प्रतिक्षेत या परिसरातील नागरीक होते आणि विशेष म्हणजे हाच रस्ता केंद्रीय रिजर्व पोलीस बल फायर ट्रैनिंग कॅम्प ला जोडणारा असल्याने अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच माजी आमदार आमिताताई चव्हाण यांनी भोकर मतदार संघाच्या आमदार असतांना दत्तक घेतलेल्या जांभळी गावालाही जोडणारा व या परिसरातील नागरिकांना शहराकडे घेऊन जाणारा एकमेव व अतिमहत्त्वाचा रस्ता आहे.
परिसरातील लोकांची जिवनवाहीनी असलेला रस्त्याचे काम मात्र गणेश इंटरप्राईजेस या कंपनी कडुन अतिशय हलक्या व निकृष्ट दर्जाचे केले जात असुन या कामामध्ये लाल माती मिश्रीत मुरूम व मोठमोठे दगड असलेला मुरुम टाकला जात आहे या बाबत अनेक लोकांनी वेळोवेळी सांगुन देखील गुत्तेदाराकडुन कुठल्याच प्रकाराचा विचार केल्या जात नाही.
असे असताना देखील भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळ्यावरती पट्टी बांधल्या प्रमाणे सर्व काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्यास त्यांना वेळ नाही का? की उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करत आहे या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
परवानगी एका ठिकाणी उत्खनन दोन ठिकाणी.
या कामाला लागणाऱ्या मुरुम उत्खननासाठी परवानगी एका शेतकऱ्याच्या गटाची घेतली गेली आणि उत्खनन मात्र दोन ठिकाणावरुन केले जात असुन महसुल विभागाचे मंडळ अधिकारी मात्र मिलीभगत असल्या प्रमाणे कुठलीच कार्यवाही करत नसल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलाचे यामुळे नुकसान होत असुन संबंधित मंडळ अधिकारी यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन गणेश इंटरप्राईजेस वरती कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.