
मंत्री भुसेंच्या मुलाच्या फोटोवर हत्यार ठेवत ठार मारण्याची धमकी !
मालेगाव शहरात हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि गो तस्कर यांच्यातील वाद नित्याचा आहे. यावरून सातत्याने राजकारण धगधगत असते. आता या वादाने धक्कादायक वळण घेतले आहे. त्यामुळे शहरातील राजकारण तापले आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते गौरव दुसाने हे मोटरसायकलने जात होते. ते दसाने गावाकडून मालेगाव शहराकडे येत असताना त्यांना काही संशयास्पद लोक दिसले. ते गो तस्कर असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांना हटकले होते. त्यावरून वादाला तोंड फुटले आहे.
गौरव दुसाने यांनी मोटरसायकल थांबून गोवंश प्राण्यांना घेऊन जाणाऱ्या लोकांना अटकले. त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसाने यांच्या मोटरसायकलवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांचे छायाचित्र होते. गो तस्करांनी त्या छायाचित्रावर हत्यार ठेवत आमच्या मार्गात येऊ नका. अन्यथा ठार मारू. आम्ही कोणालाही घाबरत नाही, असे धमकावले होते.
हा प्रकार कळल्यावर हिंदुत्ववादी संघटना आणि मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे समर्थक चांगले संतापले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. अशा धमक्या देणाऱ्यांना भीक घालणार नाही. गो तस्करांविरोधात अधिक जोरदार मोहीम उघडण्यात येईल असे अविष्कार भुसे यांनी जाहीर केले आहे.
मालेगाव आणि विशेषता शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या मतदारसंघातच गो तस्करांनी हिंदुत्ववादी संघटना न थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. संदर्भात अद्याप पर्यंत पोलिसात कोणीही तक्रार केलेली नाही. मात्र पोलिसांनी स्वतःहून या प्रकाराची दखल घेतल्याचे कळते.
मालेगाव शहर आणि परिसरात हा उपद्रव सातत्याने वाढत आहे. त्या विरोधात आम्ही गेली अनेक वर्ष आवाज उठवत आलो आहोत. अनेकांना याबाबत कठोर शिक्षा झाली आहे. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. यापुढे अधिक तीव्रतेने गो तस्कर आणि त्यांच्या कारवायांविरोधात मोहीम उघडली जाईल, असे अविष्कार भुसे यांनी सांगितले.
यानिमित्ताने थेट मंत्र्याच्या मुलालाच जीव ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संत आपले आहेत. आता हे प्रकरण कोणत्या नव्या वळणावर पोहोचते, याची उत्सुकता आहे. ही घटना समजल्यावर परिसरात तणावाची स्थिती होती.