
पालिका निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीसांचं विधान !
राज्यात दोन नवी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातीलही दरी मिटण्याची शक्यता आहे.
ही दोन्ही समीकरणं जुळून आल्यास राज्यातील राजकारणात कदाचित वेगळे वारे वाहू लागतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हा खटाटोप सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभेत सपाटून मार खालल्यानंतर या चारही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे आज महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई हे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीसपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असतील. तसंच, वसई विरारमध्ये ईडीने छापेमारी केली असून ४१ बेकायदेशीर इमारतप्रकरणात धडक कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यासह राज्यातील विविध अपडेट्स जाणून घेऊयात.