
22 एप्रिल रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले.
या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, मात्र प्रत्येक वेळी भारताने अधिक आक्रमक आणि ठाम प्रतिसाद देत पाकिस्तानला माघारी हटवले. भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि युद्ध पेटण्याच्या सीमारेषेवर स्थिती पोहोचली. या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसांनंतर अखेर शनिवारी (दि. 10) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. पाकिस्तान भारताशी झुंजत असला तरी पाकिस्तानचे अस्तित्व भारताच्या समोर काहीही नाही. भारताच्या एका राज्याची लोकसंख्या ही पाकिस्तानच्या समान आहे. भारत केवळ एका अणुबॉम्बच्या सहाय्याने पाकिस्तानला बेचिराख करू शकतो.
यूपीच्या समान आहे पाकिस्तानची लोकसंख्या
1947 साली जेव्हा पाकिस्तान हा देश बनला. तेव्हा पाकिस्तानची लोकसंख्या 3.5 कोटी होती. त्यावेळी यामध्ये पूर्वीचा पाकिस्तानही समाविष्ट होता, ज्याला आज बांगलादेश म्हणतात. 2025 सालाच्या अंदाजानुसार, पाकिस्तानची लोकसंख्या 25 कोटींचा आकडा पार करेल. तर भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजेच, पाकिस्तान थेटपणे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताच्या तुलनेत कुठेही टिकत नाही.
इतकंच नाही तर पाकिस्तानची संपूर्ण लोकसंख्या केवळ भारताच्या एका राज्याच्या बरोबरीची आहे. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार आणि त्यानुसार अंदाज बांधल्यास 2025 साली उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सुमारे 24 कोटी लोकसंख्या असेल. म्हणजेच लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता संपूर्ण पाकिस्तान फक्त यूपीच्या बराबरीचा आहे.
एक अणुबॉम्बमध्ये पाकिस्तान होईल बेचिराख
पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा भारताने पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली, तेव्हा पाकिस्तान भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्याचा प्रयत्न करत होता. पण पाकिस्तानचे अस्तित्व भारताच्या एका अणुबॉम्बमुळे मिटू शकते. भारताकडे विविध प्रकारचे अणुबॉम्ब आहेत, ज्यांचे वजन 100 ते 200 किलो टन किंवा त्याहून अधिक असू शकते. त्यामुळे जर भारत-पाकिस्तानच्या कोणत्याही शहरांवर हे अणुबॉम्ब टाकले गेले, तर ते पूर्णपणे नष्ट होऊ शकतात.