
महाराष्ट्रामध्ये येणार फाॅक्सकाॅन प्रकल्प हा 2022 मध्ये गुजरातला गेल्याने राजकारण पेटले होते. महाविकास आघाडीने यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे राजकारण पेटले होते तो तो फाॅक्सकाॅन प्रकल्प अखेर गुजरातला देखील न मिळता उत्तर प्रदेशला मिळाला आहे.फाॅक्सकाॅन प्रकल्पातून सुमारे एक लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता होती. या प्रकल्पासाठी पुण्याजवळीली तळेगाव एमआयडीसीची जागा देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने महायुती सरकारवर टीका करण्यात आली होती.
राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला गेल्याची जाहीर टीका आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली होती. तर, या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला देणार असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू होते.
तीन हजार 700 कोटीची गुंतवणूक
केंद्र सरकारने फॉक्सकॉनचा सहवा सेमी कंडक्टर प्लँट बनवण्यासाठी मंजूरी दिली. तीन हजार 700 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प उत्तर प्रदेश के यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जेवर विमानतळाच्या जवळ उभा राहणार आहे. 2027 पासून या प्रकल्पातून उत्पन्न सुरू होण्याची शक्यता आहे.