
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. तर आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिर्मीत चौंडी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आरक्षणावर मार्ग काढतील असं या कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. आपल्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी मागेल ते दिलं असेही पडळकर म्हणाले. तसेच या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अहिल्यादेवींची आजपर्यंत इवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस साहेब मी आज काहीच मागणार नाही. आरक्षणाचं तुमच्या मनात आहे. यासाठी देवाभाऊ लवकरच मार्ग काढतील. आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवा भाऊने आणि शिंदे साहेबांनी मागेल ते लिहून दिलं होतो मात्र कोर्टात निकाल आमच्या विरोधात गेला. ओबीसीचं आरक्षण गेला होता मात्र आपलं सरकार आल्यावर आहे असं थांबवलं. दोघांनी कोर्टात आरक्षणासाठी आपली बाजू लावून धरली असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला असा आरोपही यावेळी पडळकर यांनी केला आहे.
तसेच या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मोठी मागणी करत धर्मांत बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आणि लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने आणावा अशी मागणी केली आहे.
यावेळी आमदार पडळकर म्हणाले की, राज्यात लवकरच धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहाद कायदा अस्तितवात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आणावा आणि लव्ह जिहादविरोधात कायदा संभाजी महाराजांच्या नावाने आणावा. अशी मागणी या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.