
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. राणे यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील पोलिस स्थानकात 2 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. मागील दोन सुनावणीच्या वेळी नितेश राणे अनुपस्थित राहिल्याने जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
सत्तांतराच्या नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून केला होता. यानंतर संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. याची सुनावणी माझगाव दंडाधिकारी कोर्टात सुरु आहे.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. हे विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्या याचिकेनुसार, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं. या संदर्भात संजय राऊत यांनी तक्रार देखील दाखल केली होती. या प्रकरणी माजगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापांसून संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हे दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारपो करत आहेत.