
बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या निवृत्तीनंतर राजीव शुक्ला अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. सौरव गांगुलीनंतर बिन्नी हे बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष बनले.
बिन्नी यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने 2024 चा टी20 विश्वचषक आणि 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. बिन्नी यांचा कार्यकाळ खूप यशस्वी ठरला आहे. बीसीसीआयच्या वयोमर्यादेच्या नियमामुळे लवकरच ते आपल्या पदावरून पायउतार होतील. नियमानुसार, 70 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर त्यांना आपले पद सोडावे लागेल.
रॉजर बिन्नी 19 जुलै 2025 रोजी 70 वर्षांचे होतील
भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी 19 जुलै 2025 रोजी 70 वर्षांचे होतील. त्यानंतर ते निवृत्त होतील. अशा परिस्थितीत, आता राजीव शुक्ला अध्यक्ष होण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. 2022 मध्ये रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. बिन्नी यांनी सौरभ गांगुली यांची जागा घेतली. 1983 मध्ये भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील बिन्नी महत्त्वाचे सदस्य होते. 1983 च्या विश्वचषकात बिन्नीने शानदार गोलंदाजी केली आणि 18 विकेट्स घेण्यात ते यशस्वी झाले. दुसरीकडे, राजीव शुक्ला 2020 पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी 2017 पर्यंत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि 2018 पर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. अधिकृत घोषणा बिन्नीच्या वाढदिवसाच्या (19 जुलै) जवळ येण्याची अपेक्षा आहे, परंतु जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर शुक्ला या जुलैमध्ये बीसीसीआयच्या कामाची जबाबदारी स्वीकारतील.
राजीव शुक्ला कोण आहेत?
राजीव शुक्ला एक यशस्वी पत्रकार असण्यासोबतच एक यशस्वी राजकारणी आहेत आणि आता ते क्रिकेट प्रशासक म्हणून खूप यशस्वी झाले आहेत. राजीव शुक्ला यांचा जन्म 13 सप्टेंबर 1959 रोजी झाला. राजीव शुक्ला हे एक यशस्वी राजकारणी देखील आहेत. त्यांची गणना काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवले. राजकारण आणि पत्रकारितेनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि बीसीसीआयमध्ये सतत काम करत आहेत. त्यांनी बीसीसीआयच्या विविध समित्यांमध्ये काम केले आहे. राजीव शुक्ला यांनी आयपीएलचे अध्यक्षपदही भूषवले आहे.