
राज्यात किती रुग्ण; मृतांची संख्या किती ?
नाशिकमधून मोठी बातमी आली असून येथील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात खुद्द एक्सवर गोडसे यांनीच माहिती दिली आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारने संसर्ग वाढू नये यासाठी काही ठोस उपाय योजले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांना कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी X वर दिली माहिती
नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्याला कोविडचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट लिहिली की, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढील काही दिवस घरीच अलगीकरणात राहील. या काळात तुम्हाला प्रत्यक्ष भेटू न शकल्याबद्दल मी दिलगीर आहोत. आम्ही सर्वांना स्वतःची आणि आमच्या कुटुंबाची काळजी घेण्याची नम्र विनंती करतो!” त्यांनी पुढे लिहिले की “तुमच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. मी लवकरच पूर्णपणे निरोगी होईन आणि तुमच्या सेवेत परत येईन.
कुठे किती रुग्ण?
मुंबई – 26
ठाणे -6
नवी मुंबई- 6,
पुणे – 27
पिंपरी-चिंचवड -3
कोल्हापूर – 2
सांगली – 5
नागपूर – 2
महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर
दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, केरळमध्ये सर्वाधिक 1416 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 494 आणि दिल्लीत 393३ सक्रिय रुग्ण आहेत. कर्नाटकात 311, तामिळनाडूमध्ये 215 आणि पश्चिम बंगालमध्ये 372 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीमसारख्या काही राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. तेथे सक्रिय रुग्णांची संख्या खूपच कमी आहे.
महाराष्ट्रातील कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज जारी झालेल्या कोविड डॅशबोर्डनुसार, महाराष्ट्रात चार मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 55 वर्षांचा पुरुष, ज्याला एच/ओ कार्डियाक अॅरिथमिया आहे आणि तो अँटीअॅरिथमिया होता. रुग्णाला क्रॉनिक ब्राँकायटिससह सीओपीडीचाही त्रास होता.या रुग्णाचा मत्यू झाला. 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कार्डिओजेनिक शॉक, पार्किन्सन रोग, कोविड 19 न्यूमोनिया, उच्च रक्तदाब होता त्याचा मृत्यू झाला. 23 वर्षांची महिलेला मधुमेह मेल्तिस, एचटीएनने ग्रस्त तसेच 27 वर्षांच्या तरुणाला आयएचडी, जुना पीटीबी, एलआरटीआय, अल्कोहोल विथड्रॉल सीझर होता अशा रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे.