दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी-प्रा विजय गेंड
बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. निलेशकुमार रत्नमाला रामचंद्र आडत यांना दिनांक 29 जून 2025 रोजी साई दरबारी शिर्डी येथे माननीय पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यांच्या सन२००२पासूनच्या गुणवत्ता पूर्ण कार्यासाठी,शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्यातील आदर्श सेवेसाठी त्यांची निष्ठा,समर्पण भावना आणि परिश्रम हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.त्यांचे पदव्युत्तर शिक्षण बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे झाले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस, शंकरनगर अकलूज येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभाग पाहिला.राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकूण 36 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या यशाबद्दल सर्व क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
