
दैनिक चालु वार्ता मुदखेड प्रतिनीधी :- शिवाजी एडके
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास बापु देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुक्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख सरदार गुलाब सिंघ महाराज यांनी विश्वप्रसिध्द सचखंड मधील गोदातीर वर असलेल्या मातासाहेब देवांजी या गुरुध्दारा परिसरात वृक्षारोपन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गुरुध्दारा येथील सेवाधारी बाबाजी यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले, याप्रसंगी प्रदेश संघटक मनोज कमटे यांनी विचार व्यक्त केले. नांदेड जिल्हा अध्यक्ष अशिष कल्याने पाटील व मुदखेड तालुका अध्यक्ष शिवाजी एडके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमूख यांच्या दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुगट येथील जि.प. येथे शालेय साहित्य वाटप
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास बापू देशमूख् यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जि.प. हायस्कूल येथील शाळेमध्ये लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. व शाळेच्या प्रागंणात वृक्ष लागवड सुध्दा करण्यात आली. यानंतर जि. के. इंग्लीस स्कुल मध्ये सुध्दा शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रदेश संघटक मनोट कमटे नांदेड जिल्हाध्यक्ष आशिष पाटील कल्याणे, जि.प. हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे, संस्थाप्रमुख किशनराव कल्याणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या़ कार्यक्रमांचे आयोजन ता. शिवाजी एडके यांनी केले. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते