
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर व्हावा. यासाठी प्रयत्न चालू केले असून, त्या विरोधात आज मालेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून, रास्ता रोको आंदोलन केले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
5 जुलैच्या विजयी मेळ्याव्याचं मोदी-शहा व फडणवीसांना आमंत्रण देणार -संजय राऊत
हिंदी सक्तीविरोधातील शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांना निमंत्रण देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. ५ जुलैला मराठी विजय दिवसाचे आम्ही तिघांनाही आमंत्रण देणार आहोत. तेव्हा त्यांनीही पाहावं की हा विजयी सोहळा नेमका काय आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्याचं संजय राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बाजुने बोलणाऱ्यांचे निलंबन व चेष्ठा करणाऱ्यांचा सन्मान : नाना पटोले भडकले
पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं आहे. त्यानंतर पटोले भडकले असून जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल त्याला सभागृहातून निलंबित करायचं आणि जो शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात व शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना हे सरकार सन्मानाने वागवतं अशी टीका पटोले यांनी केली आहे.