टीम इंडियाने पहिल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या अंडर 19 टीममध्ये पाच मॅचेसची वन-डे सीरिज होत आहे.
यासीरिजमधील पहिली मॅच झाली. इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र, हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. या मॅचमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने खेळलेल्या तुफानी इनिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. वैभव सूर्यवंशीने 252 च्या वादळी स्ट्राईक रेटने बॅटिंग करत टीम इंडियाा विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले.
आयपीएल 2025 मध्ये आपल्या तुफानी बॅटिंगने चर्चेत आलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये धुमाकूळ घालत आहे. भारताची अंडर 19 टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या युथ वनडेमध्ये शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. या मॅचमध्ये विजय मिळवण्यात वैभव सूर्यवंशीनेही महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 48 रन्सची तुफानी खेळी केली. टीम इंडियाने 50 ओव्हर्सची मॅच केवळ 24 ओव्हर्समध्येच जिंकली.
वैभव सूर्यवंशीची तुफानी इनिंग
या मॅचमध्ये वैभवने इंग्लंडच्या बॉलर्सला धू-धू धुतले. वैभव सूर्यवंशीने 19 बॉल्समध्ये 48 रन्स केले. या इनिंगमध्ये वैभवने 5 सिक्सर आणि 3 फोर मारले. वैभव सूर्यवंशीने जॅक होमच्या एका ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले. जॅक होमच्या पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन्स मिळाले, ज्यामध्ये वैभवने पूल शॉटवर टॉप एजवरुन सिक्सर मारला. त्यानंतर मिड ऑनवर आणि काऊ कॉर्नरला आणि खी दोन सिक्स मारले.
स्लो लेफ्ट-आर्म स्पिनर राल्फी अल्बर्ट गोलंदाजी करण्यासाठी येताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच बॉलवर पॉईंटवर कॅच आऊट झाला. यानंतर टीम इंडियाने आणखी तीन विकेट्स गमावल्या. पण विकेटकीपर अभिज्ञान कुंडूने नॉटआऊट 45 रन्स केले आणि टीम इंडियाने विजय मिळवला.
भारतीय बॉलर्सची कमाल
टीम इंडियाच्या जबरदस्त बॉलिंगमुळे इंग्लंडची संपूर्ण टीम 42.2 ओव्हर्समध्ये 174 रन्सपर्यंत मजल मारु शकली. टीम इंडियाकडून कनिष्क चौहान याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. तर हेनिल पटेल, आरएस अंब्रिश आणि मोहम्मद एनान या तिघांनी प्रत्येकी दोन – दोन विकेट्स घेतल्या.
