
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी – पंडित चौगुले
कोल्हापूर दि. 1:कोल्हापूर शहरामध्ये राजारामपुरी येथे शाहूनगर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा अर्ध पुतळा आहे त्याच्या सहभोवती शुशोभीकरण करण्यासाठी 2014 साली आमदार फंडातून निधी मंजूर झालेला होता. त्या निधीतून थोडेफार काम झालेला आहे. पण राहिलेल्या कामाकडे आज पर्यंत म्हणजे साल 2025 पर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे( अनुसूचित जाती युवा मोर्चा) कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राहुल सोनटक्के, प्रशांत अवघडे उपाध्यक्ष, भिकाजी सोनटक्के शहर उपाध्यक्ष, निलेश चोपडे मीडिया संयोजक, महादेव मोरे, अरुण देवकुळे, दावीत भोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.