
ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांची क्लिप तुफान व्हायरल !
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा करण्यात आली आहे.
मंत्री राठोड यांच्या कार्यकर्त्यांशी अयोध्या पौळ या बोलत होत्यात तेव्हा त्यांनी हा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.मात्र अयोध्या पोळ यांच्या या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.
त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे तरी काय, काय आहे प्रकरण ?
ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या अयोध्या पौळ यांची ही ऑडिओ क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्या संजय राठोडांना चपलेने मारण्याची भाषा करत असल्याचे दिसत आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्यानुसार, संजय राठोड यांच्या एका कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल करत आधी जय महाराष्ट्र म्हटलं. त्यांच्यातील संवाद खालील प्रमाणे –
कार्यकर्ता – जय महाराष्ट्र
अयोध्या पौळ – कोण बोलतंय ? बोला जरा लवकर
कार्यकर्ता – मी उमेश राठोड बोलतोय
अयोध्या पौळ – उमेश राठोड ? कुठून बोलताय तुम्ही ?
कार्यकर्ता – मी बीडमधून बोलतोय
अयोध्या पौळ – बरं, बोला…
कार्यकर्ता – ते संजय राठोडचं काय झालं ? त्या पोस्टमध्ये काय आहे.
अयोध्या पौळ – तुम्ही जे नाव घेतलंत, कुठल्या व्यक्तीचं, त्या माझ्या पोस्टमध्ये ते नाव आहे का ? पोस्टमध्ये काय लिहीलंय, ते वाचायची अक्कल आहे की नाही तुम्हाला ? अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा, त्याचं सगळं चित्रा वाघने काढलं ना…असल्या माणसाला तपलेने बडवलं पाहिजे. संजय राठोडसारख्या माणसाला भर चौकात चपलेने मारलं पाहिजे. मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणत्ये…संजय राठोडसारख्या माणसाला… जे चित्रा वाघने आरोप केलेत, त्या आरोपनुसार, संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलेने बजवलं पाहिजे..
असं त्याचं संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
तुमच नाव सदावर्ते नव्हे..सदा ओरडे असलं पाहिजे, पौळ भडकल्या..
याच दरम्यान, काल गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेवर अयोध्या पोळ यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. गुणरत्न सदावर्ते यांचा महाराष्ट्रासाठी आणि मराठीच्या हितासाठी काय योगदान आहे ? असा सवाल पौल यांनी विचारला.
सदावर्ते हे त्यांच्या वैयक्तिक घराचा विषय असल्यासारखं ओरडत आहेत. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचां बोला आणि मग आगपाखड करा. तुम्ही अजुलचे आहात..तुम्ही ज्या प्रकारे बोलता तसा मला सुधा बोलता येतं, मलापण गावाकडच्या लय म्हणी पाठ आहेत. तुम्ही सगळ्यांचे बाप काढत असता ना, माझ्या समोर या मग मी आहे आणि तुम्ही आाहात, असं आव्हान पौळ यांनी दिलं.
आम्हाला तुमच्या घरावर बोलायचं नाही. पण तुमच्याच लेकरांना धड ना हिंदी येता ना मराठी ना इंग्लिश बोलता येतं. सिद्धिविनायकमध्ये ड्रेस कोड निघाला त्यावेळी सदावर्तेंची मुलगी जैन यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी एक वाक्य बोलताना, त्या हिंदी, मराठी, इंग्लिश सगळंच मिक्स करून बोलत होत्या. तुमच्या घरातल्या लेकरांना अगोदर मराठी, हिंदी आणि इंग्लिश नीट शिकवा. ज्या भाषेत प्रश्न विचारला आहे त्या भाषेत उत्तर द्यायला शिकवा असा टोला त्यांनी हाणला.
मराठी बांधवांचा आणि ठाकरेंचा हा विजय आहे. तो विजय आम्ही जल्लोष करतोय, यात तुमचं पोट दुखीच कारण काय ? असा सवाल विचारत तुमच नाव सदावर्ते नव्हे सदा ओरडे असं असायला पाहिजे होतं कारण तुम्ही सतत ओरडत असता, अशी घणाघाती टीका पौळ यांनी केली.