
सनसनाटी आरोपाने खळबळ…
मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत.
वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना देखील मारायचे होते, असा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले बांगर?
वाल्मिक कराड याचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितले की आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे. मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितले, असा धक्कादायक खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर अनेक आरोप केले आहेत. माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे.
मी वाल्मीक कराडचं काम करत नसल्याने आणि त्याचं ऐकत नसल्याने त्याने माझ्यासमोर पिस्तूल ठेवली आणि मला म्हणाला गोळी झाडून घे, किंवा तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकून तुला अडकवतो असा देखील धक्कादायक खुलासा यावेळी बांगर यांनी केला आहे.
याच दरम्यानन वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी ऐकवली, त्यामध्ये कराड हा शिविगाळ करताना दिसत आहे. दरम्यान बांगर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.