
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
ठाणे,दि.03(जिमाका) :- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये राजर्षी शाहू जयंती पर्व निमित्त दि.26 जून, 2025 ते दि.04 जुलै,2025 कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्राबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांच्यावतीने या कार्यालयास प्राप्त जात वैधता प्रमाणपत्रातील अर्जामध्ये त्रुटी आहेत. अशा शैक्षणिक प्रकरणात त्रुटींची पुर्तता करण्यास्तव दि.27 जून 2025 रोजी समिती कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तरी या विशेष शिबिरास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी कळविले आहे.