
दी सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सरकारकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनामुळे शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरेंना एकप्रकारे क्लीन चिट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही.
हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. मात्र, या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळला आहे.
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर पोलिस तपासात काहीही आढळले नाही, तर राणेंच्या आरोपांचा काय अर्थ? या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही नितेश राणेंवर घणाघात करत “नाक घासून माफी मागा,” असा सल्ला दिला होता.
या सर्व घडामोडींमध्ये आता नितेश राणेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी माध्यमांसमोर सांगितले की, दिशा सालियन प्रकरणाचा एसआयटी अहवाल १७ जून रोजी आला असून त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली जावी. “हा विषय फक्त माझा नाही, दिशा सालियनच्या वडिलांनीही न्यायालयात अॅफिडेविट सादर केलं आहे. त्यांचे आरोप राजकीय आहेत का?” असा सवाल करत राणेंनी सरकारवर आणि ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं. इतकंच नाही तर नितेश राणेंनी म्हणाले, “पिच्चर अभी बाकी है… न्यायालयाने १६ तारखेची पुढील तारीख दिली आहे, तेव्हा काय होतं ते बघू. सरकारने दिलेला अहवाल पाहू, त्यात सत्य बाहेर येईल.” त्यांनी हेही सांगितले की, प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याविरोधात आपण पत्र दिले आहे, आणि याची चौकशी व्हायलाच हवी.
याच दरम्यान, विधिमंडळाच्या परिसरात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करत त्यांच्यावर खिल्ली उडवली. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. दरम्यान, राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. “मी आमदार आहे हे त्यांनी लपवलं आणि व्यवसायिक असल्याचं भासवलं,” असं म्हणत त्यांनी साक्षीपुरावे तपासण्याची मागणी केली आहे. दिशा सालियन प्रकरणात जरी पोलिसांनी आत्महत्येचा निष्कर्ष दिला असला तरी नितेश राणे हे प्रकरण राजकीय गतीने पुढे नेत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. १६ जुलैला न्यायालयात काय नवं उलगडतं, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सरकारकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनामुळे शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरेंना एकप्रकारे क्लीन चिट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. मात्र, या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळला आहे.