
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरामध्ये ,विठ्ठलमय वातावरणामध्ये चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी येथे रिंगण सोहळा रंगला.
विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम ,संत नामदेव, मुक्ताबाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षक ठरले या पालखी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य निकिता माने तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रारंगणामध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला .हा सोहळा सदस्य निकिता सोमनाथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शाळेतील सर्व मुला मुलींनी यावेळी वारकऱ्यांच्या पोशाख परिधान केले होते .सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडला यावेळी जसे काही पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात उपस्थित असणारे विद्यार्थी आज पांढरे शुभ्र कपड्यांमध्ये व गळ्यामध्ये टाळ घेऊन या सोहळ्याचा आनंद घेताना दिसली. लहान मुली सुद्धा या ठिकाणी काष्टा साडी व डोक्यावर तुळशी घेऊन नटून-थटून कार्यक्रमाची शोभा वाढवत होत्या.
जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा यावेळी विठ्ठल नामाचा गजर करत होते यांनी सुद्धा या कार्यक्रमाची रंगत वाढवली जसे की टाळ वाजवणे पथक भिरभिरावने ज्ञानोबा व तुकाराम महाराजांच्या नावाचा उल्लेख करत फुगड्या खेळत व रिंगणाचा आनंद घेत हे वातावरण पूर्ण भक्तीमय झाले होते.
चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर पालखीचे भव्य दिव्य मिरवणूक निघाली यात प्रशालेचे नर्सरी पासून ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हरिनामाचा गजर करत पालखीमध्ये सहभागी झाले होते.
शेवटी प्रशालेच्या प्रारंभळावर पालखीची आरती प्राध्यापक सुनील गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आली.व पालखी सोहळ्याची सांगता झाली.
सदर पालखी सोहळ्याचे संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रांजली सुतार यांनी केले तर पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व दिंडी प्रमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे सर यांनी केले तर आभार मोनाली मोरे मॅडम यांनी केले