
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व लोकसंग्रही आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारी, महमदपूर व इस्माईलपूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामपंचायत सदस्य शमीमखान पठाण यांच्या वतीने राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह इतर शालेय साहित्य, तसेच पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विशेष प्रेरणादायी ठरला असून शिक्षणाबाबत त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. उपस्थित पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन मोहन पाटील थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गिरजे, सोसायटी संचालक वाहेद पठाण, अहमद पठाण, आकील पठाण, तौशिब पठाण, मुस्तफा पठाण, आजम पठाण, आरेफ पठाण, तसेच रशीद शेख, शरद पवार, मोहसीन पठाण, मोहन कणसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत कणसे, मिठ्ठू कणसे, अंकुश कणसे, भगवान दहीफळे, शिवनाथ कणसे, सचिन कणसे, बाबासाहेब साळुंके, श्रीराम भणगे, तसेच शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी आमदार विलास बापू भुमरे यांच्या सामाजिक जाणीवेबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थ व पालकांनी अशा विधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.