
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) :
पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नर्मदा कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती, पंचायत समिती पैठण तथा व्हाईस चेअरमन रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना नंदकुमार पठाडे, माजी संचालक संत एकनाथ साखर कारखाना राजेंद्र औटे, नवनियुक्त संचालक खरेदी विक्री संघ अनिल हजारे, माजी चेअरमन शिक्षक पतसंस्था तथा माजी उपसरपंच कुतुबखेडा सुनील चितळे, उपसरपंच वडगाव पांडुरंग ठोंबरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मकता निर्माण झाली असून, समाजातही शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे. गरजू विद्यार्थ्यांना भक्कम साथ देणारा आणि प्रेरणा देणारा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.