
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत येथील महेश होनराव यांची कन्या कु.आर्या होनराव हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-2025) मध्ये उल्लेखनीय यश मिळवत 720 पैकी 565 गुण प्राप्त केले. देशपातळीवर (AIR) दर्जेदार रँक मिळवत आर्याने आपल्या मेहनतीची आणि चिकाटीची शर्थ सिद्ध केली आहे.
तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल भूम नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व मा.नगराध्यक्षा सौ.संयोगिता ताई गाढवे यांच्या शुभहस्ते तिचा यथोचित सत्कार करण्यात आला. नानांचे सहकारी मित्र म्हणून महेश सरांचा गौरवाचा क्षण उपस्थितांनी आनंदाने साजरा केला.
कार्यक्रमास विविध मान्यवर, शिक्षकवर्ग, पालक व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. आर्या हिला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.