
दैनिक चालु वार्ता वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पिक विमा जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यात पीक विम्याबाबत विस्तृत माहिती आणि शेतकऱ्याचे हित यावर मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रम ३ जुलै २५ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा येथे पार पडला भारतीय कृषी विमा कंपनी तर्फे पिक विमा सप्ताहचे नियोजन करून फसल विमा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली त्यामध्ये उपस्थित तांत्रिक अधिकारी निकेश इंगोले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शुभम सराफ आणि तालुका प्रतिनिधी अमर कांबळे हे उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यास जनजागृती केली यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती