
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.
पुरंदर जेजुरी : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान _DJAY-S अंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी (PMSvanidhi) योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनांचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारीक अर्थव्यवस्थेत समावेश करणे हा आहे.
pmsvanidhi लाभार्थी यांनी डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थीना कर्जाच्या रक्कमेव्यतिरीक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे.त्यासाठी दिनांक 07 जुलै 2025 ते 12 जुलै 2025 या कालावधीमध्ये मै भी डिजिटल हया माहिमेमध्ये पी एम स्वनिधी मधील पात्र लाभार्थी यांनी
तसेच स्वनिधीसे समृदधी योजना अंतर्गत फेरीवाल्यांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण प्रोफाईलींग नुसार जेजुरी शहरातील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व इतर योजनांचा लाभ घेणेबाबत दिनांक 7 जुलै 2025 ते 12 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आपले आपल्या कुटुंबांचे आधार कार्ड घेऊन यावे व सोबत येताना मोबाईल सुद्धा घेऊन यावा. तसेच पात्र लाभार्थी यांना नगरपालिका मार्फत संपर्क केला जात असून सदरील लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जेजुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले तसेच प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बागडे यांनी केले.