
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर तर सचिवपदी प्रा. रामदास केदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी, दि. ६ जुलै रोजी नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत कोषाध्यक्षपदी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, उपाध्यक्षपदी डॉ. सुरेश शिंदे व प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, सहसचिव म्हणून अनिता यलमटे व एकनाथ राऊत यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून विवेक होळसंबरे, बाबुराव माशाळकर, सूर्यकांत शिरसे, रसूल पठाण, प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, डॉ. धनाजी कुमठेकर, प्रा. डॉ. व्हि. डी. गायकवाड, विनोद मठपती, प्रवीण जाहुरे, राजकुमार मोगले, प्रा. राजपाल पाटील, सुरेखा गुजलवार, अलका केदार आणि विक्रम हलकीकर यांची निवड करण्यात आली.
शाखेचे सल्लागार म्हणून मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भरत चामले, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, ॲड. पद्माकर उगिले, विश्वनाथ बिरादार, प्रा. डॉ. बाळासाहेब दहिफळे, प्रा. डॉ. राम साबदे, ज्योतिबा कांदे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ. जयदत्त जाधव यांनी काम पाहिले.
संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आल्यामुळे परिसरातील साहित्यिक व सांस्कृतिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी ॲड. संजय हुले, मोतीलाल डोईजोडे, अंबादास केदार, प्रा. व्यंकट सूर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, सुनंदा सरदार, शिवाजी बिरादार, प्रमोद पदातूरे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.
शहरातील साहित्यिक चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत.