
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
जालना (मंठा )
मंठा तालुक्यातील पाडळी (दुधा) ग्रामपंचायत अंतर्गत मातोश्री पांदण रस्त्याचे काम ठेकेदारांनी रोजगार साह्यक मग्रारोहयो विभागातील एपीओ, सीडीओ. पीटीओ यांना हाताशी धरून रोजगार हमी व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम न करता ठेकेदार व कर्मचारी भागेदारीत गुतल्यामुळे खिसे भरण्याच्या नादात रस्त्याचे काम मजुरावर न करता मजुराचे हजेरीचे फोटोवर फोटो काढून जेशीबी मशीनच्या साह्याने थातूर-मातुर करण्यात आले आहे.त्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामस्थ प्रसाद घुगे व बालासाहेब घोरसडे यांनी गटविकास अधिकारी मंठा, कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना. जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना १६ पत्र व्यवहार झाले आहे. त्या १६निवेदनाचा संदर्भ देत पाडळी (दुधा )येथील पांदन रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या रोजगार सेवक तांत्रिक सहाय्यक त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती नेमून चौकशी करावी रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यक यांना बडतर्फ करण्याची तक्रार बालासाहेब घोरसड व प्रसाद घुगे यांनी दी.03जुलै २०२५ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजना मुख्य कार्यालय नागपूर आयुक्तालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाडळी (दुधा )ग्रामपंचयत अंतर्गत मातांची पांदण रस्त्यावर २८०००० लक्ष अकुशल पेमेंट मजूर कामावर असताना दोन वेळचे फोटो ऑनलाईन काढणे शासनाच्या जीआर असताना मात्र रोजगार सह्यकाने मजूर कामावर नसताना भलत्याच लोकाचे फोटो वरून फोटो काढून ऑनलाईन हजेरी मस्टर काढुन रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यक यांनी शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. पांदण रस्त्याचे कामे चालु असतांना तक्रारदारांनी बोगस काम होत आहे असा अर्ज केला असता रोजगार सेवक व तांत्रिक साह्यक या दोघांनी अरेरावीची भाषा केली आणि तुम्हाला आमच्या दोघांवर कुठे तक्रार करायची तिथे करा आमंच कोन्ही काही वाकडे करू शकत नाही तांत्रिक साह्यक स्थानिक तालुक्यातील असून गेली दहा वर्ष मंठा पंचायत समिती मध्ये कार्यरत असुन त्यांची शासनाच्या नियमाप्रानणे बदली का ? होत नाही. असे प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार सहाय्यक व तांत्रिक सहाय्यक यांची उच्चस्तरीय समिती गठीत करुन दि.२०/०७/२०२५ पर्यंत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच रोजगार हमी योजनेमधील त्यांना या कामास मदत करणारे अधिकारी व कर्मचारी यांची सुध्दा चौकशी करून त्यांच्यावर सुध्दा नियमा प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी विनंती करण्यात आली आहे. दि.२०/०७/२०२५ पर्यंत त्यांची चौकशी न झाल्यास मा.विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अमरण उपोषण करण्यात येईल व या उपोषणा दरम्यान उपोषणकर्ते यांच्या बायत काही अनुचित प्रकार पडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे