
दडपण असेल तर चॅम्पियन चांगली कामगिरी करतात. आणि त्यातही अनुभवी खेळाडू असेल तर त्याला दडपण आपल्यापेक्षा इतरांना कसं द्यायचं हे समजतं. एजबॅस्टन कसोटीत बेन स्टोक्सचा बळी वॉशिंग्टन सुंदरला मिळाला
पण, त्यासाठी रवींद्र जडेजा कसा मोलाचा ठरला ते पाहा. भोजनाची वेळ जवळ आलेली असताना भारतीय संघ प्रयत्न करत होता ते जेमी स्मिथ आणि बेन स्टोक्स यांची जमलेली जोडी फोडण्यासाठी. सत्रातील शेवटचं एक शतक बाकी असताना जडेजा गोलंदाजीला आला. आणि कर्णधार शुभमनशी तो काहीतरी बोलला. त्याने पुढचं शतक चक्क १०० सेकंदांच्या आत पूर्ण केलं. एकतर त्याची गोलंदाजी लयबद्ध होती. त्यामुळे जेमी स्मिथला विचारपूर्वक खेळावं लागत होतं. आणि त्यातच जलद शतक टाकल्यामुळे आणखी एक शतक टाकण्याचा वेळ भारतीयांना मिळाला.
हा खरंतर सापळा होता. बोनस म्हणून मिळालेल्या या शतकतच वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सचा बळी मिळवला. ही चाल भारताने जाणीवपूर्वक रचली होती. अतिरिक्त शतक टाकावं लागल्यामुळे स्टोक्सही थोडासा गोंधळला. आणि भोजनापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर त्याचा बळी गेला. हा अर्थातच, इंग्लिश संघासाठी मोठा धोका होता. शिवाय इंग्लंडची अवस्था ६ बाद १५२ झाली.
इंग्लंडमधील बेभरवशाच्या हवामानाने आपला रंग एजबॅस्टन कसोटीच्या पाचव्या दिवशीही दाखवला. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. आणि त्याचा फायदा भारतीय गोलंदाजांना मिळाला. शिवाय पाऊस थांबून अचानक सूर्यही उगवला. त्यामुळे खेळ सुरू झाला. आणि इंग्लिश फलंदाजांना भारतीय गोलंदाज भारी पडले. पावसामुळे दमट झालेल्या खेळपट्टीवर आकाशदीपचे चेंडू सुरुवातीपासून फिरत होते. त्याने पहिल्या सत्रापासूनच फलंदाजांवरील दडपण वाढवलं.
या कसोटीत नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लिश संघाच्या अंगलोट आला. एकतर पहिल्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळवता आली नाही. आणि भारताने पहिल्या डावांत ५८७ धावांचा डोंगर रचला. दुसरीकडे, इंग्लिश संघावर भारताने कायम दडपण ठेवलं. भारतासाठी शुभमन गिलने पहिल्या डावांत २६९ आणि दुसऱ्या डावांत १६१ धावा केल्या. तर आकाशदीप आणि सिराज यांनी डावांत पाच बळी घेतले. भारतीय संघ इंग्लंडपेक्षा फलंदाजी, गोलंदाजी आणि तंत्रातही सरस ठरला.