
भाजप नेत्यानं दिलं थेट आव्हान !
दोन ठाकरे बंधूंची युती झाली तर अभिनंदन आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊदे.. जोपर्यंत हे एक होणार नाहीत, तोपर्यंत त्यांची ताकद कळणार नाही. पण, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा अपमान उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून करण्यात आला.
ते मनसेचे नेते विरसले का? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
प्रसाद लाड म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालीतर अभिनंदन आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊदे… जोपर्यंत ठाकरे बंधू एक होणार नाहीत, तोपर्यंत त्यांची ताकद कळणार नाही. पण, राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचा अपमान ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. हे मनसेचे नेते विरसले का?”
काँग्रेसची मते पळवून उद्धव ठाकरे राजकारण करतायेत
तसेच, उद्धव ठाकरे हे आज सन्माननीय राज ठाकरे म्हणत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना गरज लागते तेव्हा ते हात पकडतात. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा हात तर राहूल गांधी यांचे पाय पकडले. आज ते राज ठाकरे यांचा हात पकडू इच्छितात. राज ठाकरेंचा हात पकडताना काँग्रेस कुठे आहे, याचा विचार करत नाही. काँग्रेसने मुस्लीम मते ठाकरेंकडे दिली. आज तीच काँग्रेसची मते पळवून उद्धव ठाकरे राजकारण करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण हीन दर्जाचं आहे, हे आपल्या लक्षात येईल,” अशी टीका लाड यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे षंxxx मुख्यमंत्री होते
“हिंदी भाषेचा जीआर उद्धव ठाकरेंनी काढला होता. माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या हातात दिला होता. ते किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते, हे लोकांच्या समोर येईल. एखाद्या मुख्यमंत्र्याला अहवाल दिला जातो, तेव्हा ते वाचण्याचं त्यांचं काम असते. ते म्हणतील मी ते वाचलं नाही, तर ते किती षंxxx मुख्यमंत्री होते, हे दिसतंय,” असे टीकास्त्र लाड यांनी सोडले आहे.
ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एकतरी भूमिका मराठीबद्दल बोलून दाखवली का?
“निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा बाऊ केला जातोय. ‘म’ मराठीचा नाहीतर महानगरपालिकेचा आहे. हा प्रकार कुठेतरी उद्धव ठाकरेंनी थांबवला पाहिजे. राज ठाकरेंबद्दल त्यांची भूमिका जनतेत सांगितली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एकतरी भूमिका मराठीबद्दल बोलून दाखवली का? हे सांगा. गद्दार, खंजिरच्या पलीकडे ते बोलले. यामुळे राज ठाकरे सुद्धा अचंबित झाले होते, असेही लाड यांनी म्हटले.