दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
—————
दिवा – दिव्यातील साबेगावात मोबाईलवर व्हिडिओ बघत असताना बैंगलोर वरुन वडिलांचा आलेला फोन आईला न दिल्याने आईने पोटच्या साडेचार वर्षीय मुलीला अमानुष मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. सदर घटना घडतानाचा व्हिडीओ दुसऱ्या मुलीने आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करून याची माहिती आजीला दिली व आजीने तन्वीची आई यशोदा हिच्या विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली.
काल सकाळी १०:३० वाजता आई यशोदा गुडीमिटला वय वर्ष २८ हीने स्वतःची लहान मुलगी (तन्वी) हिला तिचा मोबाईल व्हिडिओ/गेम पाहण्यासाठी दिला तेव्हाच मुलीच्या सावत्र वडिलांचा बैंगलोरवरुन फोन आला पण तो त्या मुलीने आईला न देता तो कट केला. तीन ते चार फोन केल्यानंतरही फोन उचलला नसल्याने पती संजय हा भलताच वैतागला, काही वेळाने पुन्हा फोन केले असता यशोदाशी फोनवर बोलणं झालं त्यावेळी पती संजय ने तीला खरीखोटी सुनावली, जेव्हा यशोदाने स्वतःचा फोन तपासला तेव्हा तिच्या लक्षात आले की नवऱ्याचे चार फोन येऊन गेलेत, त्यामुळे रागावलेल्या आईने त्या साडेचार वर्षांच्या तन्वीला अमानुष मारहाण केली. तन्वी चे सावत्र वडील संजय यांची सक्खी पाच मुले ही मारहाण थांबवण्यासाठी धडपडत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत असून आई यशोदा ने त्यांचे एक ऐकले नाही. त्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या मुलीने रेकॉर्ड करुन तन्वीची आजी जया गुडीमिटला यांना पाठवला असता ते लगेचच सायन वरुन दिव्याला येऊन तन्वी च्या आई विरोधात त्यांनी दिवा पोलीस चौकीत तक्रार दिली. पोलीसांनी काल रात्री लहान मुलीचा आणि मोठ्या मुलीचा जबाब नोंदवून मारहाणीचा व्हिडिओ बघून तक्रार नोंद केली. त्यानंतर त्या मुलांच्या आईला पोलीस स्टेशनला बोलवून समज देऊन सोडले परंतु यशोदा (तन्वी ची आई) हि सध्या राहत्या घरातुन बेपत्ता झाली असून दिवा पोलीस यशोदा (आईचा) शोध घेत आहेत.
