
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव – नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) –
द्वादशीच्या पावन पर्वावर रथ गल्ली, पेठ भूम येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी मा. नगराध्यक्ष विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे व मा. नगराध्यक्षा सौ. संयोगिता ताई गाढवे यांनी उपस्थित राहून श्रद्धेने श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे पूजन व महाआरती केली.
आरतीच्या सुरांमध्ये भक्तगण हरवून गेले होते. नानांनी महाप्रसादाचा लाभ घेत भाविकांशी संवाद साधला. आयोजकांच्या वतीने नानांचा सपत्नीक पुष्पहार व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी परिसर भक्तिरंगात रंगला होता. विठ्ठलनामाच्या गजरात सर्व वयोगटातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.