
तुमचे नाव लाभार्थ्यांत आहे की नाही हे कसे शोधायचे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अनेक बोगस लाभार्थ्यांची नावे दिसून आली असून काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेत शिरकाव केला आहे.
ही बाब लक्षात घेता आता सरकारने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु केली आहे. त्यासह काही अपात्र असूनही पात्र दाखवून लाभ घेतेलेले लाभार्थी आहेत, त्यामुळे या यादीतून हजारो नावे वगळण्यात आली आहे.
आता या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा आणि अपात्र व्यक्तींना वगळले जात आहे. ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन, बंगला आणि अडीच लाखांवर उत्पन्न आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे आधीच सरकारने स्पष्ट केले होते, त्यानंतर पडताळणी केल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांसंदर्भात सरकारने निर्णय घेतला आहे. काही अपात्र लाभार्थींविषयी तपासणीनंतर महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे.
याविषयी यापुर्वीच महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले होते की, सरकारने या योजनेचा गैरफायदा घेतलेल्या २,२८९ महिलांना यादीतून वगळले आहे. यामध्ये बहुतांश महिला सरकारी नोकरीत असलेल्या असल्याचे उघड झाले आहे. महिलाव व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता तुमचे नाव पात्र लाभार्थ्यांमध्ये आहे की नाही हे तुम्ही खालील गोष्टी वापरुन समजून घेऊ शकता.
घरबसल्या असे तपासा तुमचे नाव योजनेत आहे की नाही?
सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा पूर्ण नाव भरा.
काही सेकंदात, तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
जर “नो रेकॉर्ड सापडला नाही” असे लिहिले असेल तर याचा अर्थ तुमचे नाव काढून टाकण्यात आले आहे.
जर तुमचे नाव चुकून काढून टाकले गेले तर काय करावे?
घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही खरोखरच योजनेसाठी पात्र असाल आणि तरीही नाव काढून टाकले गेले असेल, तर तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता. तक्रारीच्या वेळी ही कागदपत्रे तुमच्यासोबत ठेवा – आधार कार्ड, बँक पासबुक, योजनेचा नोंदणी क्रमांक (जर असेल तर) तसेच तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले आहे आणि ई-केवायसी पूर्ण झाले आहे याची खात्री करा.
असे तपासा.. खात्यात पैसे जमा झाले की नाही..
नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
लॉगिन प्रक्रिया: अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
मंजूर यादी तपासणी (अॅप): अॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
स्थिती अद्ययावत: अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.