
जिल्ह्यातील चार हजार होमिओपॅथी डॉक्टर आपल्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे यांनी दिली.
होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला स्थगिती दिल्याने राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर बुधवारी (दि. १६) मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारने ९ जानेवारी २०१४ रोजी होमिओपॅथी डॉक्टरांना लोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली. त्यासाठी एक वर्षाचा सीसीएमसी कोर्स पूर्ण करण्याची अट घालती होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टरांची नोंदणी रखडली. त्यानंतर राज्य सरकारने १५ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवातही केली.
परंतु सीसीएमसी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला अॅलोपॅथी संघटनांनी विरोध दर्शवला आणि राज्य सरकारकडे अशा डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रक्टिससाठी परवानगी देऊ नये, अशी विनंती केली. त्या विरोधात बुधवार (दि.१६) पासून होमिओपॅथी डॉक्टरांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हॉमिओपॅथी डॉक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील खैरनार, शहराध्यक्ष डॉ. अमोल वाझे यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे चार हजार डॉक्टरांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
विरोधामागील हे आहे कारण…
अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघाने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे लिहिण्याच्या परवानगीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ८ जुलै रोजी आयएमएने सरकारला पत्र पाठवून, होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात सराव करण्याची परवानगी दिल्यास लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.
डॉ. मुकेश मुसळेआम्ही स्पालयात दाखल करणांवर उपचार करत असून, नवीन आम्ही रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करत असून, नवीन एकही रुग्णाची बुधवारी तपासणी केली नाही. पूर्णपणे संपात सहभागी आहोत.