
मुलगीही अडचणीत; काय आहे प्रकरण ?
भारतीय क्रिकेटपटून मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ आणि त्याची मुलगी अर्शी जहां या दोघी एका मोठ्या वादात अडकल्या आहेत. मात्र त्यांचा हा वाद शमीसोबत नाही तर त्यांच्या शेजाऱ्यासोबत झाला.
यादरम्यान हसीन जहाँची तिच्या शेजाऱ्यांसोबत हाणामारी देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी हसीन जहाँ आणि तिची मुलगी अर्शी जहाँविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्शी ही हसीन जहाँच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. हसीन जहाँचा तिचा पती, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशी वाद सुरू आहे. यामुळे ती तिच्या मुलीसोबत पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे राहत आहे. अलिकडेच, कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना घरखर्चासाठी दरमहा 4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
कशामुळे झाला वाद ?
मिळालेल्या माहितीनुसार, हसीन जहाँ ही तिच्या मुलीसह एका जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करत होती. तिच्या शेजाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला असता तिचा वादा झाला आणि त्याचे हाणामारीतही रुपांतर झालंय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हसीन जहाँ एका महिलेशी भांडताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी हसीन जहाँ आणि तिची मुलगी अर्शी जहाँ यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ बऱ्याच काळापासून तिची मुलगी आयरासोबत पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये राहत आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. अलिकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
शमीसोबतही वाद सुरू
हसीन जहाँचा तिचा पती मोहम्मद शमीसोबतही वाद सुरू आहे. अलिकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला दरमहा 4 लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पत्नी हसीन जहाँ हिला 1.5 लाख तर त्यांची मुलगी आयरा हिच्यासाठी 2.5 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.