
घडलेली घटना दुर्दैवी; विधानसभा अध्यक्ष अन्…
आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. पडळकर यांनी आव्हाड यांना विधानभवनाच्या गेटवर शिवीगाळ केली होती. यानंतर आता थेट विधानभवनात पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले आहेत.
पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता गोपीचंद पडळकर यांनीही भाष्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचे मला दु:ख आहे. ही जागा विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या आख्यारित्या येते. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाकीची माहिती देतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “घडलेली घटना एकदम चुकीची आहे. अशाप्रकारचे इथे घटना घटने योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याअंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, अशी मी विनंती केली आहे.”
“एकतर मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानसभेला शोभत नाही. त्यामुळे निश्चित कारवाई झाली पाहिजे,” असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “समर्थक आहेत की गुंड आहेत? ही परिस्थिती राज्यावर आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? हल्ला करणाऱ्यांना ज्यांना पास दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, गुंडगिरी ही विधानभनापर्यंत पोहोचली असेल तर हे फार अवघड आहे.
आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? हल्ला करणाऱ्यांना ज्यांना पास दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, गुंडगिरी ही विधानभनापर्यंत पोहोचली असेल तर हे फार अवघड आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांच्या पोशिंद्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच तुम्ही पालक म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहेत. गुंड आणून मारामाऱ्या होत असतील तर मैदानात या…विधानभवन हे पवित्र मंदीर आहे. गुंड आतमध्ये येत असतील तर विधानभवनाला काय महत्त्व राहिले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.